जाहिर लिलाव
ते रविवार दि.7.10.2012 रोजी सायंकाळी ठिक 5.30 ते 9.30 वाजेपर्यंत गणरायाच्या स्टेजवर
होणार असून भाविकांनी याची नोंद घ्यावी.
छायाचित्र संग्रह
गणेशोत्सव २०१२ - दररोजची आरती
लालबागचा राजा - २०१२ ची दररोजची आरती पाहण्यासाठी कृपया येथे
गणेशोत्सवासाठी मार्ग
यावर्षी लालबागच्या राजाला नवस करण्यासाठी वा फेडण्यासाठी आलेल्या भाविकांची नवसाची रांग ग.द.आंबेकर मार्गावरील ओमशांती डेव्हलपर्सच्या आवारातून लागेल. या ठिकाणी पोहोचण्यासाठी भाविकांनी करीरोड - भारतमाता सिनेमा - साईबाबा पथ - ग.द.आंबेकर मार्ग - अभ्युदय नगर या मार्गाचा वापर करावा. रेल्वे मार्गाने येणाऱयांनी मध्य रेल्वेचे करीरोड स्थानक वा पश्चिम रेल्वेचे लोअर परेल स्थानक अथवा हार्बर मार्गाचे कॉटनग्रीन स्थानक येथे उतरावे.
लालबागच्या राजाचे मुख दर्शन घेऊ इच्छिणाऱया भाविकांची `मुख दर्शन रांग' गणेशोत्सव 2011 सारखीच असेल. ही रांग दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी येथून चालू होऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण (गरमखाडा) मार्गे श्रीं च्या आवारात येईल. मुख दर्शन घेऊन इच्छिणाऱया भाविकांनी मध्य रेल्वे मार्गाचे चिंचपोकळी स्थानक अथवा हार्बर रेल्वे मार्गाचे कॉटनग्रीन स्थानक येथे उतरावे.
www.lalbaugcharaja.com आता www.lalbaugcharaja.in या स्वरुपात उपलब्ध आहे.






